>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>
कॉलेजमध्ये प्रवेश घेण्यासाठी आवश्यक कागदपत्रे अॅटेस्टेड करण्यासाठी विद्यार्थ्यांना आता नगरसेवक , आमदार , एसईओ यांच्या दाराशी रांगा लावण्याची गरज भासणार नाही . कारण प्रवेश घेण्यासाठी आता विद्यार्थ्यांनीच स्वतः त्यांच्या कागदपत्रांवर त्यांची सही केली तरी चालणार आहे . म्हणजेच , सेल्फ अॅटेस्टेड कागदपत्रे प्रवेशासाठी ग्राह्य धरली जाणार आहेत .
कॉलेज प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना त्यांच्या कादपत्रांवर , प्रमाणपत्रांच्या झेरॉक्स प्रतींवर अॅटेस्टेशन मिळवण्यासाठी भरपूर वेळ खर्च करावा लागतो , तसेच अनेकदा पैसेही खर्च करावे लागतात . यामुळे सेल्फ अॅटेस्टेड कागदपत्रांना मान्यता द्यावी , अशी मागणी शालेय शिक्षण राज्यमंत्री फौजीया खान यांनी मुख्यमंत्र्यांना भेटून केली आहे . मुख्यमंत्र्यांनी याला मान्यता दिल्याने विद्यार्थ्यांचा मोठा त्रास कमी होणार आहे . विद्यार्थ्यांनी झेरॉक्सवर स्वतःची स्वाक्षरी करावी . प्रवेशाच्या वेळी कॉलेजांनी मूळ गुणपत्रिका आणि झेरॉक्स तपासून घ्यावे आणि प्रवेश द्यावा , असेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले .
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा